मनोगत

सरचिटणीस यांचे मनोगत

सर्व प्रिय सन्न्माननीय सभासद बंधु भगीनींनो सप्रेम नमस्कार, आपली संघटना म्हणजेच “महाराष्ट् स्टेट गव्हर्नमेंट मोफयुसील स्टेनोग्राफर्स असोशीएशन, नागपूर” ही महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय विभागातील कार्यरत लघुलेखकांची एकमेव शासन मान्यताप्राप्त संघटना असून शासन, सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय क्रमांक आरजीए-1073/19990/360-जे,दिनांक 25 जानेवारी 1974 जारी करुन शासन मान्यता प्रदान केलेली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीयुत गंधे हे आयुक्त, नागपूर यांचे लघुलेखक म्हणून तर श्री. पंडीत हे अधिक्षक अभियंता,पाटबंधारे विभाग यांचे लघुलेखक म्हणून कार्यरत होते. त्यांनी अथक परिश्रमाने केवळ नागपूर महसुल विभागासाठी ही संघटना उभी केली. त्यानंतर श्री.विनायक गोड़डे हे सरचिटणीस असतांना त्यांनी श्रीयुत गंधे यांच्या सहकार्याने संघटना वाविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.पुढील वाटचाल चालु असतांना व संघटना राज्य स्तरावरुन काम करीत असतांना शासन स्तरावरुन संघटनेस मोडता घालण्याचे काम करण्यांत आले. त्यास तत्कालीन अध्यक्ष श्रीयुत मथाई व सरचिटणीस श्री. अनिल शाहु यांनी मोठया प्रयत्नाने संघटनेची मुळ घटना दुरुस्त करुन संघटनेस राज्यस्तरावर नेवून पोहोचविले तेव्हाच सन 1988 मध्ये अस्मादिक नुकतेच नागपूर येथे स्थानांतरावर रुजु झाले होते. ख-या अर्थाने राज्यभर संघटनेने बाळसे धरण्यास सुरुवात केली होती. त्या कालावधी पर्यंत राज्याच्या कोणत्याही शासकीय विभागामध्ये कार्यरत लघुलेखक हे सेवेत रुजु झाले पासून लघुलेखक म्हणून कार्यरत राहत असत व त्याच पदावरुन सेवानिवृत्त होत असत. त्या काळात मराठी लघुलेखनाचे जनक श्रीयुत इनामदार हे पुणे विभागामार्फत संघटनेस आर्शीवादरुपी सेवा देत होते. जानेवारी 1986 पासून पुर्वलक्षी प्रभावाने चवथा वेतन आयोग राज्यामध्ये लागु करण्यांत आला. परंतु राज्यामध्ये चवथा वेतन आयोगाची स्थापना झालेनंतर श्रीयुत सुखटणकर, माजी मुख्य सचिव हे त्या आयोगाचे अध्यक्ष झाले. त्या आयोगासमोर संघटनेने जेव्हा सादरीकरण केले तेव्हा संघटनेमार्फत लघुलेखक संवर्गात राजपत्रीत पद निर्मीतीविषयी विनंती करण्यांत आली होती. त्याचाच परिपाक म्हणजे मंत्रालयातील निवड श्रेणी लघुलेखकांचा दर्जा देवून मंत्रालयाबाहेर त्याचे पदनाम स्वीय सहाय्यक असे करुन दिनांक 16 ऑक्टोबर 1990 चा शासन निर्णय जारी होणे हा होय. तेव्हापासून या संवर्गातील कर्मचारी हा राजपत्रीत अधिकारी वर्ग-2 च्या पदावरुन लघुलेखकांना सेवानिवृत्त होण्याची संधी संघटनेमुळे प्राप्त झाली. नंतरच्या काळात जेव्हा शासनाने वर्गवारी बंद करुन गटवारी सुरु केली त्यावेळी स्वीय सहाय्यकांचे पद गट अ मध्ये वर्ग करण्यांत आले. त्यानंतर श्रीयुत ठोंबरे व श्री. शाहु यांचा कार्यकाळ सुरु होता मात्र त्यांच्या उत्तरार्धात संघटना अर्धमृत अवस्थेत गेली होती. त्यामुळे विशेषत: पुणे व नाशिक विभागाकडून संघटनेस मुर्त स्वरुप देण्याचे काम सुरु होते, त्यामध्ये पुणे विभागातील श्री. बडे व श्री. पांचाळ यांनी पाचव्या वेतन आयोगाचे वेळी लघुलेखक (निम्नश्रेणी) या पदाची वेतनश्रेणी मा. न्यायालयाच्या मार्गाने वाढवून घेतली. त्यानंतर पाचव्या वेतन आयोगातील त्रुटी समिती करिता वर नमूद पुण्याचे दोन्ही पदाधिकारी यांनी जिवापाड मेहनत घेतली व त्याकरिता नाशिकविभागाचे श्रीयुत मतलाणी, श्री. गीते, श्री. वैद्यव श्री. अघाव शिवायऔरंगाबाद विभागातील श्री. मोहीते, श्री. व्यास श्री. गुजर, श्री. ढवळे यांनी देखील मोलाचे सहकार्य केले. 28 एप्रिल 2007 रोजी नागपूर येथील संघटनेच्या सभेत नविन कार्यकारीणी तयार करण्यांत येवून मा. श्री. हरिष वरुडकर अध्यक्ष व माझी सरचिटणीस म्हणून निवड करण्यांत आली. तेव्हापासून सतत संघटनेस जिवंत स्वरुप आणून उपरोक्त दोन्ही विभागाची नाराजी दूर करण्यास्तव सर्वप्रथम पुढाकार घेण्यांत आला. तेव्हापासून पाचव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणेस्तव संघटनेचा संघर्ष पुणे नाशिक, अमरावती, कोंकण असा दूरगामी प्रवास करुन संघटनेस मुर्त स्वरुप देण्यांस मुख्यालयाबाहेरील अमरावती विभागाचे अध्यक्ष व माझे जिवलग मित्र श्री. महेन्द्र गायकवाड यांनी अतोनात मेहनत घेवून संघटनेचा लढा तेवत ठेवण्यास फार मोठा हातभार लावला. नागपूर मुख्यालयातील सर्व पदाधिकारी यांनी विस्कळीत झालेली आर्थीक घडी सुधारण्यास मोलाचा वाटा उचलला. त्या करिता विशेष उल्लेखीत व्यक्तीमत्व म्हणजे श्री.विकास डांगरे, श्री. वामनराव तितरमारे, डॉ. सोहन चवरे, श्री.विजय मालपे, श्रीमती विद्या गुरलवार श्री. महेश पवार, श्री. मंगेश हेमणे, श्री. ढवळे, श्री.निशात हुसैन, श्री. रामटेके, श्री. फटींग इत्यादि सर्वांनीच संघटनेस सर्व बाजुंनी बळकट करण्यांस मोठा हातभार लावला. सर्वप्रथम 2007 पासून शासनाकडे जेव्हा विषय मांडण्यांत आला त्यावेळी संघटनेची स्थीती अशी होती की, लघुलेखक हा विषय सामान्य प्रशासन विभागानेच हाताळावा कारण राज्यातील सर्वविभागातील लघुलेखक हे सामान्य प्रशासन विभागाच्या सेवाप्रवेश नियमानुसारच कार्यरत असतात हे सिध्द करण्यांतच जवळपास 1 वर्षाचा कालावधी लोटला तेव्हा शासन स्तरावर हे मान्य करण्यांत आले. त्यानंतर सतत संघर्ष करीत पुणे, नाशिक, अमरावती, औरंगाबाद व कोंकण विभागामध्ये संघटनेमध्ये जागृती आणण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यांत येवून सर्वांनी तन-मन-धन ओतून सहकार्य केले. कोकण विभागातील श्रीमती नेहा ढमढेरे, सिडको मधील श्रीमती चव्हाण, श्री. वाघ, श्री.सोरते यांनी मुंबई येथील कामाकरिता विशेष मदतीची प्राधान्याने नोंद घ्यावी लागेल. संघटनेस आर्थीक पाठबळ देण्याकरिता मंत्रालयीन लघुलेखक संघटनेचे माझे मित्र श्री.मिलींद अंचेकर, श्री. वेटकोळी, श्रीमती सरोजा लक्ष्मणन यांनी सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळे संघटना पुढे चांगली वाटचाल करु शकली व राज्यात मंत्रालयाबाहेर अवर सचिव दर्जाचे वर्ग-1 वरिष्ठ श्रेणीचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक हे पद निर्मीती करुन संघटनेने आमच्या कारकिर्दीत एक मानाचा तुरा रोवला. सातव्या वेतन आयोगामध्ये तर संघटनेने अजून एक पायरी वर चढत अवर सचिव दर्जाच्या वरची वेतनश्रेणी प्राप्त करवून घेतली आणि संवर्गातील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुलेखक (उच्चश्रेणी), स्वीय सहाय्यक अशा सर्वच संवर्गबंधूची वेतनश्रेणी एक-एक टप्प्याने वाढवून देण्यांत आली त्यामध्ये लघुटंकलेखक या पदाची वेतनश्रेणी वाढवू शकलो नाही याचे शल्श् मात्र मनात कायम राहील. वेतनश्रेणी वाढीद्वारे राज्य सेवेतील गट-ब मध्ये सर्वात जास्त वेतनश्रेणी घेण्याचा बहुमान संघटनेमुळे प्राप्त झाला ही संघटनेची फार मोठी उपलब्धी ठरली. संघटना अशीच उत्तरोत्तर वाढो व संवर्गातील सर्वच पदे राजपत्रीत दर्जा प्राप्त करतील अशी आशा बाळगुन मी माझे मनोगतासविराम देतो. संघटनेच्या भविष्यातील वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा |

(दिलीप देशपांडे)
सरचिटणीस